Latest

gold price : पाकिस्तानात एक तोळा सोन्याचा भाव 1 लाख, 64 हजार,150 रुपये

Arun Patil

इस्लामाबाद : पाकिस्तानचे कंगालपण संपण्याची सुतराम शक्यता नाही. जगातील असे एकही श्रीमंत राष्ट्र नसेल ज्याकडे पाकिस्तानने कर्जासाठी, मदतीसाठी हात पसरले नाहीत. खाद्यान्नासह या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीही आकाशाला भिडल्या आहेत. सध्या पाकिस्तानात, तिथल्या चलनात 224 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा भाव आहे. पालेभाज्या आणि फळांची अवस्थादेखील अशीच दयनीय आहे. त्यामुळे सकाळी पोट भरले तर संध्याकाळचे काय, अशी वेळ तेथील गरीब जनतेवर ओढवली आहे. या देशातील सोन्याचा भाव (gold price) ऐकून तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

आपल्या देशात सोन्याचे भाव (gold price) प्रतितोळा 50 हजार रुपयांच्या पुढे गेल्यावर अनेकांनी बोटे मोडली; मात्र सोन्याची खरेदी काही कमी झाली नाही. पाकिस्तानात भारतापेक्षाही सोने महाग आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी पाकिस्तानातील सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे. गरीब जनतेकरिता सोन्याची खरेदी करणे हा विचारसुद्धा मनात आणणे महाकठीण आहे. जिओ टीव्हीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये एक तोळा सोन्यासाठी 1 लाख, 64 हजार,150 पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. कारण तेथे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे.

पाकिस्तान सराफा जेम्स आणि ज्वेलर्स असोसिएशनकडून हे भाव जाहीर करण्यात आले आहेत. शिवाय नजीकच्या काळात यात आणखी उसळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून पाकिस्तान आणि भारतातील सोन्याचा (gold price) दरामधील फरक सहज लक्षात येऊ शकतो. तथापि, पाकिस्तानचा रुपया आणि भारतीय रुपया यांचे मूल्य बघता, भारतीय रुपयात हे दर कमी आहेत.

SCROLL FOR NEXT