Latest

Titanic ship : टायटॅनिकचे अवशेष बाहेर काढण्याची तयारी; अमेरिकेचा विरोध

Arun Patil

वॉशिंग्टन : 'कधीही न बुडणारे जहाज' अशी जाहिरात करून निघालेले 'टायटॅनिक' Titanic ship आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाले होते. या दुर्घटनेवर आधारित हॉलीवूडचा 'टायटॅनिक' चित्रपट जगभर गाजला आणि तो 'ऑल टाईम फेव्हरिट'ही बनला. समुद्रतळाशी असलेले टायटॅनिकचे अवशेषही जगभरातील लोकांच्या कुतुहलाचा विषय बनतात. हे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या काही अब्जाधीशांचा 'टायटन' पाणबुडीच्या स्फोटात अलीकडेच मृत्यूही झाला. आता या जहाजालाच समुद्रातून बाहेर काढण्याची तयारी एका कंपनीने केली आहे. त्याला अमेरिकेचा विरोध आहे.

'न्यूयॉर्क टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की जॉर्जियाच्या 'आरएमएस टायटॅनिक इंक' नावाच्या कंपनीने 2024 पासून टायटॅनिकचे Titanic ship अवशेष बाहेर काढण्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या सरकारने मात्र संघीय कायदे आणि आंतरराष्ट्रीय समझोत्यांचा हवाला देत त्याला विरोध दर्शवला आहे. संघीय कायदे आणि आंतरराष्ट्रीय समझोत्यांनी या जहाजाच्या अवशेषांना 'दफनभूमी'च्या रूपात मान्यता दिलेली आहे. काही दिवसांपूर्वीच टायटन पाणबुडीच्या स्फोटात पाचजणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याबाबतचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

टायटॅनिकच्या Titanic ship अवशेषापर्यंत कोण जाऊ शकतो, त्याच्या पर्यटनातून कुणाचे हित जोडलेले आहे? असे काही प्रश्न त्यामध्ये होते. खरे तर 'आरएमएसटी'कडेच टायटॅनिकच्या अवशेषांबाबतचे अधिकार आहेत. हीच कंपनी टायटॅनिकचे अवशेष बाहेर काढून त्यांचे प्रदर्शन करीत असते. त्यामध्ये काही मौल्यवान आणि दुर्मीळ वस्तूंचाही समावेश आहे. या जहाजाच्या अवशेषातून कलाकृती बाहेर काढण्याबाबत आता अमेरिकन सरकारही कायदेशीर लढाई लढत आहे. या बुडालेल्या जहाजाचे समुद्रतळाशी असलेल्या अवशेषांचा शोध सर्वप्रथम सप्टेंबर 1985 मध्ये लावण्यात आला होता. समुद्रात 12500 फूट खोलीवर या जहाजाचे अवशेष आहेत. 1994 मध्ये 'आरएमएसटी'ला याबाबतचे अनेक अधिकार देण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT