रक्षाबंधनला भावांसाठी खास मऊ मऊ मलईचे लाडू तयार करा Pudhari
Latest

Rakshabandhan 2024 : या रक्षाबंधन दिवशी भावासाठी बनवा हे खास लाडू

अमृता चौगुले

श्रावणाची चाहूल लागली कि विविध सण साजरे करण्याची सुरुवात होते. श्रावणात साजरा केला जाणारा लोकप्रिय सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाच्या नात्याला एक रेशमी धाग्यात गुंफणारा हा सण आहे. रक्षाबंधनचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक ग्लॅमरस होत असले तरी त्याच्या मुळाशी असलेले भावंडांचे प्रेम मात्र कुठेच कमी होताना दिसत नाही .यंदाही 19 तारखेला रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे.

लाडक्या भावाला बांधण्यासाठी बहीणींनी फॅन्सी राख्या खरेदी केल्या असतील तर बहिणीही भावांना सरप्राइज देण्यासाठी सज्ज असतील. या रक्षाबंधनला भावांसाठी खास मऊ मऊ मलईचे लाडू तयार करा आणि भावाकडून घसघशीत ओवाळणी वसूल करा.

लाडू साठी साहित्य :

दूध - 2 लीटर

लिंबाचा रस - 2 चमचे

वेलची पावडर - पाव चमचा

condenced मिल्क - 3/4 कप

तूप - 1 चमचा

साखर - चवीनुसार

मलई - 1/4 कप

कृती :

एका भांड्यात अर्धा कप दूध काढून बाजूला ठेवा.

उरलेल्या दुधात लिंबाचा रस टाकून पनीर बनवा.

हे पनीर एका मऊ सूती कापडात बांधून वेगळे ठेवा.

एका भांड्यात दूध, मलई आणि तूप टाकून घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ढवळून घ्या.

त्यानंतर मिल्क पावडर, साखर, पनीर, condenced मिल्क एकत्र करून मंद आचेवर शिजवा.

यात वेलची पावडर टाकून मिसळा.

मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळा.

सुक्या खोबऱ्याने किंवा केसरने सजवू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT