Latest

Prarthana Behere : मुंबईच्या ट्रॅफिकचा…प्रार्थना बेहेरेने मुंबई सोडली, पाहा कुठे घेतलंय घर? (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पवित्र रिश्ता फेम प्रार्थना बेहेरे मुंबई सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालीय. (Prarthana Behere) मुळात हे घर खूप शांत ठिकाणी असल्याचं समजतय. प्रार्थनाने आपल्या बंगल्याची झलकदेखील एका व्हिडिओमध्ये दाखवलीय. तिने तिच्या यु-ट्यूब चॅनेलवर घराचा व्हिडिओ शेअर केलाय. ती आपल्या घराबद्दल काय सांगते आणि मुंबई सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला ती का गेली? पाहुया. (Prarthana Behere)

मुंबईत सर्व काम आहे, मग मुंबई कशी सोडायची आणि कायमस्वरुपी दुसऱ्या ठिकाणी कसं राहायचं, असा प्रश्न प्रार्थना बेहेरेला पडला होता. खरंतर, प्रार्थना सुंदर अशा अलिबागमध्ये शिफ्ट झालीय. शांतता आणि आनंदी जीवनासाठी तिचे हे घर एकदम परफेक्ट असल्याचं प्रार्थना म्हणते.

प्रार्थनाच्या घरापासून १५ मिनिटाच्या अंतरावर मांडवा आहे. तेथून जेट्टी, बोट मिळतात. रो-रो मध्ये गाडी टाकून ४५ मिनिटांत मुंबईला जाता य़ेते. तसे म्हटले तर १ तासात अलिबागहून मुंबईला जाता येतं. मुंबईत ट्रॅफिकमध्ये फिरायलाही तितकाच वेळ लागतो, असे प्रार्थना म्हणते.

प्रार्थनाच्या अलिबागमधील घरासमोर समुद्र आहे. पवई आणि जुहूमध्ये राहत असताना घराच्या गॅलरीतून समुद्र दिसायचा. आता अलिबागच्या घरासमोर ५ मिनिटांच्या अंतरावर समुद्र आहे. आपल्या घरात सर्व प्रकारची गाणी ऐकायला देखील मिळतात, असे प्रार्थनाने आपल्या घराबद्दल आनंदाने भरभरून सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT