Latest

Prakash Ambedkar : मोदी सरकार केवळ ज्ञान देतंय; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : देशात काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीचा भारत सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आज (दि.१) सादर केला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवरून प्रतिक्रिया दिली आहे. Prakash Ambedkar

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे सरकार केवळ ज्ञान देत आहे. पण, भारतीय युवा, गरिब आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. वित्तमंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागील 9 वर्षात 12 लाख 88 हजार 293 अतिश्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला ? 'व्हायब्रंट गुजरात' मधील 7 लाख 25 हजार लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला ? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. वास्तविक सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढल्याचा माहिती स्त्रोत काय आहे ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. पीएम किसान योजनेसाठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती ही संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT