Latest

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांची खासदारकी उच्च न्यायालयाकडून रद्द

अविनाश सुतार

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा  (Prajwal Revanna) यांना अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने आज (दि.१) दिला. यामुळे माजी पंतप्रधान देवेगौडा कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत निजदकडून प्रज्वल रेवण्णा यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी निवडणूक अधिकार्‍यांना उत्पनाबाबत खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आयकराबाबतची बनावट कागदपत्रे जोडल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. (Prajwal Revanna)

याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार ए. मंजू आणि देवराजगौड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने याबाबत निकाल जाहीर करत प्रज्वल रेवण्णा यांची निवड अपात्र ठरविली आहे. त्यांना आगामी सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत सहभागी होता येणार नाही.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT