Latest

घराच्या छतावरच करा वीजनिर्मिती; वीज ग्राहकांसाठी याेजना, ७८ हजार रुपयांपर्यंतचे मिळते अनुदान

दिनेश चोरगे

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर सिस्टम बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळतेे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

  • प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अनुदान
  • घराच्या छतावर रूफ टॉप सोलर सिस्टम बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज
  • सौरऊर्जेचा वापर केल्याने वीजबिल शून्य

असे मिळते अनुदान…

रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक 78 हजार रुपये इतके निश्चित केले आहे.

येथे करा नोंदणी…

वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल अ‍ॅपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केली आहे.

वीजबिल होणार शून्य

सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

दरमहा 120 युनिट विजेची निर्मिती

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणार्‍या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणार्‍या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.

असा आहे अंदाजे खर्च…

  •  रुफ टॉप सोलरसाठी एक, दोन व तीन किलोवॅटसाठी येणारा खर्च व होणारा लाभ खालीलप्रमाणे…
  •  1 किलो वॅट 1- अंदाजे खर्च – 52000 . अनुदान – 18000, प्रत्यक्ष खर्च -34500, छतावरील लागणारी जागा -100 चौ.
    फूट
  • 2 किलो वॅट- अंदाजे खर्च 1,05,000, अनुदान -36000, प्रत्यक्ष खर्च -69000, छतावरील लागणारी जागा -200 चौ. फूट.
  • 3 किलो वॅट-अंदाजे खर्च- 157000, अनुदान – 54000, प्रत्यक्ष खर्च -103000, छतावरील लागणारी जागा – 300 चौ. फूट.
SCROLL FOR NEXT