Latest

Salaar Advance Booking : प्रभासच्या ‘सालार’ ची शाहरूखच्या ‘डंकी’ला टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोस कमाई

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या ख्रिसमसच्या निमित्ताने म्हणजे, २१ आणि २२ डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' आणि साऊथ स्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सालार' प्रदर्शित होणार आहे. 'डंकी' आणि 'सालार' आतापासूनच एकमेंकाशी टक्कर देण्यास सज्य झाले आहेत. दोन्ही चित्रपटाचे रिलीजच्या आधीच  ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून यातून ते भरघोस, अशी कमाई करत आहेत. पहिल्या २४ तासांत विकल्या गेलेल्या चित्रपटाच्या तिकिटांचे आकडे समोर आले आहेत, तर दुसरीकडे 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरचा दुसरा पार्ट रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. ( Salaar Advance Booking )

संबंधित बातम्या 

बुक माय शोच्या माहितीनुसार, अभिनेता शाहरूखच्या 'डंकी' आणि प्रभासच्या 'सालार' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंग तिकिटांचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार पहिल्या दिवसांच्या कमाईच्या बाबततील 'सालार' पेक्षा शाहरुख खानच्या 'डंकी' खूपच पुढे गेला आहे. आकडेवारीनुसार, बुक माय शोवर २४ तासांत 'सालार'ची ३७.७६ हजार तिकिटे विकली गेली असून १.४८ कोटीची कमाई झाली. तर 'डंकी' ची २८.५३ हजार तिकिटे विकली गेली आहेत. मात्र, हा आकडा केवळ एकाच व्यासपीठाचा आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 'डंकी'ची एक लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाची १ लाख ४४ हजार ६४६ तिकिटे विकली गेल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे 'डिंकी'ने ४.४६ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा आकडा ६४०० शोसाठी विकल्या गेलेल्या तिकिटांवर आधारित आहे. तर 'डिंकी' च्या तुलनेत 'सालार' ने ३.६ कोटींची कमाई केली आहे.

प्रभासच्या 'सालार' पार्ट १ सीझफायरचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. प्रभाससोबत या चित्रपटात मीनाक्षी चौधरी, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, सरन शक्ती आणि ईश्वरी राव दिसणार आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर 'डंकी' मध्ये शाहरुख खानसोबत बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी भूमिका साकारल्यात. दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि गौरी खान निर्मित 'डंकी' २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी चित्रपट लिहिला आहे. ( Salaar Advance Booking )

SCROLL FOR NEXT