Latest

पुणे : भोर उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित ; महावितरणची कारवाई

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे तीन वर्षाचे १० लाख ६२ हजार ७९० रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे रुग्णालयाचा वीज पुरवठा शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. यामुळे रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत महावितरण कंपनीने तशी नोटीस वैद्यकीय अधीक्षकांना दिलेली आहे. रुग्णालयाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे आरोग्य सेवेस मोठा फटका बसला आहे. रुग्णालयात आंतररुग्ण विभागात असलेल्या रुग्णांच्या आणि ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.

रुग्णालयाची वीज तोडण्याबाबत यापूर्वी २५ जानेवारीला नोटीस दिली होती. मात्र, रुग्णालयास शासकीय निधी मिळाला नसल्यामुळे वीज बिल भरण्यात आले नाही, असे सांगत पुढील एका महिन्याच्या कालावधीत वीजबिल भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही ते भरले नसल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित केला आहे.

SCROLL FOR NEXT