Latest

Potato Special Recipe : लोणचं-पापड खाऊन कंटाळा आलाय तर बटाट्याची काप रेसिपी करून पाहाच

स्वालिया न. शिकलगार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोजचं आपण चपाती, भाजी, आमटी खात असतो. सोबत चवीला लोणचं, पापड किंवा ठेचा घेतो. पण, तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. मग, जेवणासोबत नक्की काही चमचमीत खायचं तरी काय? असाही प्रश्न पडतो. यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Potato Special Recipe) बटाट्याची काप स्पेशल रेसिपी. हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडणार. तुमच्यासोबत लहान मुलं देखील आवडीने खाणार. पाच-दहा मिनिटात ही रेसिपी होते. शिवाय फार वस्तूही लागत नाहीत. (Potato Special Recipe)

रोजच्या जेवणात काहीरी वेगळा आणि चविष्ट बटाट्याची काप स्पेशल रेसिपी करून पाहाच. यासाठी साहित्य आणि कृती पाहा.

बटाट्याची काप करायला लागणारे साहित्य-

कच्चे बटाटे

मीठ

साखर

लाल तिखट

गरम मसाला

रवा

तेल

कृती –

पहिल्यांदा बटाटे स्वच्छ धुवून घ्या. त्याच्या साली काढून घेऊन वेफर्सचे काप करतो तसे बारीक काप करून घ्या. त्यानंतर १५ मिनिटे

मिठाच्या पाण्यात भिजायला ठेवा. १५ मिनिटांनी काप बाहेर काढून घ्या. आता एका ताटात गरम मसाला, तोडी साखर, चवीपुरता मीठ, लाल तिखट घेऊन मिश्रण तयार करा. दुसरीकडे, तवा किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. तवा गरम झाला की, थोडे तेल पसरवून घ्या.

दुसऱ्या प्लेटमध्ये रवा घेऊन त्यामध्ये बटाट्याचे एक-एक काप बुडवा. कापला दोन्हीकडे रवा लागला पाहिजे. त्यानंतर तव्यावर हे काप भाजायला ठेवा. बटाट्याचे काप तळायचे नाहीत. थोडेसे तेल घेऊन परतवून घ्यायचे.

रव्याला तांबूस रंग आला की, काप खाण्यासाठी तयार झाले, असे समजावे. किंवा हाताने बटाट्याचे काप खरपूस भाजले आहेत की नाहीत, तपासावे. छान प्लेटमध्ये काढून सजवावे, घरी जेवणासोबत खायला घ्यावेत.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT