Latest

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राजकीय बदलांची शक्यता : डॉ. नीलम गोर्‍हे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणतेही राजकीय बदल होऊ शकतात. जनतेने तशाप्रकारे मनाची तयारी ठेवावी, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या निवडक आमदारांच्या जपान अभ्यास दौर्‍यावरून परतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्यांचा खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.

या खटल्याची सुनावणी कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव आणल्यासारखे होईल. मात्र, राजकीय अनिश्चितमुळे लोकशाही व्यवस्था भुसभुशीत झाल्याचे दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे हे उपस्थित होते.

गोर्‍हे म्हणाल्या, नदीपात्रातील वृक्षतोड, वेताळ टेकडी फोडून बोगदा तयार करणे ही विध्वंसक व गंभीर बाब आहे. त्यामध्ये राज्य सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. एखादा विकास प्रकल्प सादर करता तो कितपत योग्य तसेच फायद्याचा आहे याचे नागरिकांसाठी सादरीकरण होणे आवश्यक आहे. सामाजिक संघटनांची व्याप्ती लहान असली, तरी त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे गरजेचे असते. पुण्यात पर्यावरणाच्या संदर्भात प्रशासकांकडून गाढवाचा नांगर फिरवावा अशी स्थिती झाल्याचे दिसते.

म्हणून वेताळ टेकडी आणि वृक्षतोडीच्या निर्णयाला असता किती द्यावी. वेताळ टेकडीबाबत प्रशासनाची भूमिका पारदर्शक दिसत नाही. पुण्यातील पर्यावरण टिकून राहावे, यासाठी त्यांनी पर्यावरण संघटनांची बैठक घ्यावी. सध्या राजकारणात अनिश्चितता वाढली आहे. सध्या जे घडत आहे त्याची कार्यकर्त्यांना सवय नाही. त्यामुळे, विविध पक्षांतील सर्वांवर प्रचंड ताण येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT