Latest

अलविदा 2022 : गेल्या वर्षात पुण्यात घडल्या या चांगल्या गोष्टी

अमृता चौगुले

पुणे; टीम पुढारी : बघता बघता सन 2022 हे वर्ष सरलं, पण जाता-जाता हे वर्ष अनेक चांगल्या गोष्टी देऊन संपत आहे. कोरोनाची भीती याच वर्षाने घालवून सर्व निर्बंध उठवले गेले. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना या वर्षाने उभारी दिली. आता आगामी 2023 हे वर्ष शहरासाठी उत्कर्षाची उमेद घेऊन यावे, अशाच अपेक्षा प्रत्येकाची आहे. त्यासाठी शहरातील सर्वच प्रशासकीय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. नव्या वर्षात अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावे लागतील…

पुणेकरांसाठी 2022 हे वर्ष तसं खूप चांगलं गेलं. कारण याच वर्षात गेली दोन वर्षे बंद पडलेल्या अनेक चांगल्या गोष्टी सुरू झाल्या. कोरानामुळेे लादलेले सर्व निर्बंध जून 2022च्या आधीच हटवले गेले, त्यामुळे यंदा पंढरीकडे जाणारी पालखी मोठ्या उत्साहात निघाली. यावेळचा उत्साह खूप निराळा होता. तो लाखो लोकांनी अनुभवला. कोरानामुळे फुल्ल दवाखान्यातील बेड याच वर्षात रिकामे झाले.

दोन वर्षांपासून निर्बंधामुळे साजरा न करता आलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहत साजरा करता आला. नवरात्र अन् दिवाळीपर्यंत सर्व सण 2022 मध्ये नागरिकांनी अत्यानंदाने साजरे केले. पण या वर्षात अनेक गोष्टी शहराच्या दृष्टीने काळजी वाढवणार्‍या ठरल्या. माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जरी मोक्काचे अर्धशतक पार करीत शहरातील गुंडगिरीवर अंकुश मिळवला असला, तरीही इतर गुन्हे मात्र खूप वाढले.

सेक्सटॉर्शनसह, गल्ली-बोळातील गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. ते नव्या पोलिस आयुक्तांसमोर मोठे आव्हान आहे. शहरात वाहतूककोंडीने भयंकर स्वरूप धारण केले. साक्षात मुख्यमंत्र्यांचीच गाडी त्या कोंडीत अडकल्याने चांंदणी चौकातील कोंडीला वाचा फुटली. तेथील पूल पाडला गेला. मात्र, अजूनही तेथील वाहतूककोंडी पूर्णपणे सुटलेली नाही. नव्या वर्षात मेट्रोची लाईन पूर्ण होऊन ती सुरू झाली, तर शहरातील वाहतुकीवरचा ताण किंचित कमी होईल, अशी अपेक्षा करूया.

पुण्यातील ठळक घडामोडी..

अंडरग्राउंड मेट्रोची चाचणी
मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
चांदणी चौकातील पूल पाडला
हिंजवडी मेट्रोचे काम सुरू
कोरोना आला शून्यावर
वाहतूक कोंडी वाढून प्रदूषणात वाढ
वाहनांच्या संख्येने नवी उंची गाठली
नदीसुधार प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू
मोक्काचे तब्बल पन्नास गुन्हे दाखल
सायबर गुन्हे नोंदणीची प्रत्येक ठाण्यात सुरुवात
नाट्यगृहे सुरू
गणेशोत्सव उत्साहात साजरा
बाजारपेठा बहरल्या
मिनी ऑलिम्पिकची घोषणा
शहरात झाले 16 आयपीएलचे सामने

2022 ने कोरोनाची भीती संपवली, बाजार सावरला

2023 कडून मोठ्या प्रगतीची अपेक्षा

मोक्का लावून गुंडांना चाप, तरीही क्राईम रेट वाढला

पाऊस भरपूर, मात्र हवेची गुणवत्ता घसरली

वाहतूककोंडीने केले त्रस्त, आता मेट्रोची अपेक्षा

सांस्कृतिक क्षेत्र सावरले

दवाखान्यातील बेड रिकामे झाले.

आता मास्क बाळगण्याचा सल्ला

सांंस्कृतिक
सध्या वीकेंडला नाटकांचे 'शो' होत
असून,आठही दिवस व्हावेत ही नव्या वर्षात अपेक्षा.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासह इतर
नाट्यगृहांचा प्रश्न मार्गी लागावा.
सन 2022 मध्ये कला व साहित्य
विश्वांतील अनेक मान्यवरांची अकाली
एक्झिट झाली.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव,
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सव, पुरुषोत्तम करंडक
स्पर्धा पार पडल्या.
गीतरामायणाचे शिल्पकार
ग. दि. माडगूळकर यांच्या
स्मारकाला प्रदीर्घ
लढ्यानंतर अखेर मुहूर्त.
कोबाड गांधी यांच्या मूळ
इंग्रजी कादंबरीच्या
अनुवादित पुस्तकाच्या
वादावरून वाद गाजला –
बालगंधर्व रंगमंदिराचा
पुनर्विकास, उपनगरातील
नाट्यगृहे कार्यान्वित होणे,
भाषा धोरण, सांस्कृतिक
धोरणाला मंजुरी.

शासकीय
पुणेकरांना सुरक्षा ठेवीमुळे
वाढीव वीजबिलांचा शॉक
धरणाच्या दोनशे मीटरच्या
बांधकामाला बंदी. पण,
बिल्डरांच्या दबावामुळे निर्णय मागे
उजव्या मुठा कालव्याला मोठी गळती
अडीचशे कोटी निधी मिळाला,
रिंगरोडच्या कामाला गती
उत्पादन शुल्क विभागाची
रेकार्ड ब्रेक कामगिरी
खडकवासला पर्यटनस्थळाचा
प्रस्ताव बारगळला
समाजकल्याणची 36 कोटींची
पुस्तके खरेदी रोखली

महापालिका
कोथरूड शिवसृष्टीच्या प्रवासाला ब्रेक
पुणेकरांना मिळकत करात मिळणारी
40 टक्के सूट देण्याचा प्रश्न प्रलंबित
खड्डेमय रस्ते आणि वाहतूककोंडी ही समस्या कायम
आनंदनगर ते गरवारे महाविद्यालयादरम्यान
मेट्रोचा पहिला टप्पा सुरू
नदी सुशोभीकरण आणि जायका प्रकल्पाचे काम सुरू
समाविष्ट गावांमध्ये पाणी आणि सांडपाणी
व्यवस्थापनाचे काम सुरू
नळस्टॉप चौकातील दुहेरी उड्डाणपूल सुरू
नऊ महिने महापालिकेचे प्रशासक राज
नवीन वर्षात समान पाणीपुरवठा काम पूर्ण होणार
नवीन जुना पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण होणार
नवीन वर्षात विद्यापीठ चौकातील
उड्डाणपुलाचे काम

आरोग्य
जून 2022 मध्ये कोरोना शून्यावर
ऑक्सिजन प्लान्टची क्षमता वाढवली
कमला नेहरू रुग्णालयात आयसीयू कक्ष सुरू
महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
वैद्यकीय महाविद्यालय सुरू
तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त
जागा महापालिका भरणार
कोरोना प्रतिबंधक लसीकरण
नव्या वर्षात शहरात होणार
राज्य सरकारचे पुण्यातील पहिले साथ रोग
रुग्णालय औंध जिल्हा रुग्णालय
परिसरात होणार
गोवरचा उद्रेक आणि पायबंद
क्षयरोग रुग्णांंच्या मदतीसाठी निक्षय मित्र योजना
संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासासाठी
बाणेर रुग्णालयात पालिकेची
पहिली प्रयोगशाळा सुरू होणार
कॅन्सरच्या
तपासणीसाठी ससून
रुग्णालयात
पेट स्कॅन सुविधा

कायदा सुव्यवस्था                                                                                                                                                       114 मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल
एमपीडीए (स्थानबध्दता) कारवाई करून
80 पेक्षा जास्त गुन्हेगारांना जेलची हवा
टीईटी, म्हाडा,
आरोग्य भरती घोटाळा गाजला
सेक्सटॉर्शन, लोन पे माध्यमातून
खंडणीखोरांचा सुळसुळाट वाढला
सावकारीला लगाम
घालण्यात पोलिसांना यश
अंमलीपदार्थ तस्करांना कोठडी
चाईल्ड फ—ेंन्डली पोलिस ठाण्यांचा विस्तार
शहरात आणखी दोन
नवीन पोलिस ठाणी होणार
नव्या वर्षात गुन्हेगारीला
रोखणे हेच मोठे आव्हान

पर्यावरण                                                                                                                                                                        चालू वर्षात शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीने
थैमान घातल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान
सन2022 मध्ये शहरात 1100 मिमी
पावसाची नोंद
हिवाळ्यात थंडी गायब झाली.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही थंडीचा कडाका नाही
चांगला पाऊस झाल्याने नव्या वर्षात
दुष्काळाचे सावट कमीच
शहरातील हवेची गुणवत्ता
घसरल्याने प्रदूषणात मोठी वाढ
शहरातील वाहन संख्येवर नियंंत्रण मिळवून प्रदूषण कमी करणे हेच मोठे आव्हान नव्या वर्षात शासनासमोर राहील

राजकीय
नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त
महापालिकेवर प्रशासक नियुक्त
पालकमंत्री बदलले अजित
पवारांच्या जागी
आले चंद्रकांत पाटील
हिंदूजननायक रुपात राज ठाकरे
यांच्या हस्ते सदाशिव पेठेत
हनुमान आरती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांचे बारामती
लोकसभा मतदारसंघावर लक्ष
शरद पवार यांची 24 वर्षांनी
काँग्रेस भवनला भेट
आमदार मुक्ता टिळक
यांचे निधन

मेट्रो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या हस्ते मेट्रोचा प्रारंभ
12 किमी अंतरांचे उद्घाटन
हिंजवडी ते शिवाजीनगर लाईनचे काम सुरू
चांदणी चौक उड्डाणपूल पाडला, रुंदीकरणास गती

प्रशासकीय
गेल्या दोन वर्षांनंतर सर्वाधिक दस्तनोंदणी 2022 मध्ये झाल्या.
दस्तनोंदणी घोटाळे याच वर्षात बाहेर निघाल्याने हा विभाग गाजला.

जिल्हाधिकारी कार्यालय

  • चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकातील प्रकल्पाच्या कामाला गती. चौकातील पूल पाडला. आता वाहतुकीसाठी आठ मार्गिका झाल्या आहेत.
  • फेरफार अदालतीमध्ये सातबारामधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रारनोंदी विहित मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुकास्तरावर तक्रारींचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरित करण्यात आले.
  • जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी भूसंपादनाला वेग, पुणे-मिरज, बारामती लोणंद, प्रस्तावित रिंग रोड, चांदणी चौक, राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते याठिकाणी भूसंपादनाला वेग आला आहे.

शिक्षण

  • वर्ष संपत आले तरी नविन वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरूच
  • प्रवेश आणि परीक्षा यांमध्येच विद्यार्थी अडकले
  • कोरोना काळानंतर शिक्षण ऑफलाईन झाले
  • दहावी-बारावीसह अन्य परीक्षा ऑफलाईन झाल्या ? शालेय सहलींसाठी 2 वर्षानंतर परवानगी मीळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
    नववर्षातील अपेक्षा ः
  • शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे
  • पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नविन कुलगुरूंची प्रतिक्षा
  • खासगी विद्यापीठांसाठी शुल्क नियमावली जाहीर व्हावी

बाजारपेठ

  • 2022- कोरोनानंतर ऑनलाईनसह पुन्हा प्रत्यक्षात खरेदीकडे कल
  • जीवनावश्यक वस्तूंसह अन्य क्षेत्रातही मोठी उलाढा
  • 2023- मूळ करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी
  • उच्च उत्पन्न स्लबवरील अधिभार काढून टाकला जावे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT