Latest

….आणि म्हणून पुनीत राजकुमारच्या निधनाची बातमी रजनीकांत यांच्यापासून ठेवली गेली होती लपवून

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार एक वर्षापूर्वी हे जग सोडून गेला. अत्यंत कमी वयात या लोकप्रिय अभिनेत्याची झालेली एक्झिट पाहून त्याच्या चाहत्यांच्या दु;खाला पारावार उरला नव्हता. त्यानंतर जवळपास एक वर्षाने कर्नाटक शासनाने पुनीत यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न देऊन गौरवलं. कर्नाटक राज्य दिवसानिमित्त हा सन्मान पुनीत यांना दिला गेला. यावेळी रजनीकांत आणि ज्यू . एनटीआर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांना कर्नाटक रत्न देऊन सन्मानित केलं. पुनीत यांच्या वतीने पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार आणि त्यांचे भाऊ अभिनेता शिवराजकुमार यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी पुनीत यांच्या आठवणीत अभिनेता रजनीकांत यांना अश्रू आवरणं कठीण झालं. आपल्या आठवणीना उजाळा देत ते म्हणाले, ' पुनीत हा जसं कि देवाचाही लाडका मुलगा होता. प्रल्हाद, नचिकेतप्रमाणेच अत्यंत गुणी मुलगा होता. जो काही काळ आपल्यात राहिला. आपल्याला हसवलं, मनोरंजन केलं आणि वेळ संपल्यावर देवाकडे निघून गेला.'

ते पुढे म्हणतात, पुनीतच्या अंत्यसंस्काराला मी उपस्थित राहू शकलो नाही. खरं त्यामागे मोठा कारण आहे. त्या दरम्यान माझी सर्जरी झाली होती आणि मी आयसीयुमध्ये भरती होतो. प्रकृती ठीक नसल्याने तीन दिवसांपर्यंत मला पुनीतच्या निधनाचीही बातमी देण्यात आली नव्हती. त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बेंगलोरला मी उपस्थित राहू शकलो नव्हतो. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर पुनीतचा हसरा चेहरा कितीतरी दिवस माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता.'

SCROLL FOR NEXT