Latest

आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रास पोलिसांचे समन्स

backup backup

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली निधी गोळा करून अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी माजी खासदार किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांना समन्स बजावले आहे.

दोघांनाही शनिवारी सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मानखुर्दमधील रहिवासी माजी सैनिक बबन भोसले (53) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी 7 एप्रिल रोजी सोमय्या पिता-पुत्रासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी केला होता आरोप

आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्यात आला होता. तो पैसे राजभवनात जमा करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. आरटीआयमधून ही माहिती बाहेर आली आहे. जवळजवळ ५७ कोटी रुपये ही रक्कम असल्याची माहिती समजते आहे.

याबाबत राज्यपालांच्या कार्यालयात आरटीआय अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती त्यामध्ये राज्यपाल कार्यालयाकडून असा कोणताही निधी जमा झाला नसल्याचे सांगण्यात आले. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हा निधी भाजपच्या कार्यालयात गेला. या पैशाचा गैरवापर वापर किरीट सोमय्यांनी केला आहे. या घोटाळ्यात किरीट सोमय्या हेच मुख्य सुत्रधार आहेत. त्यांनी आपल्या कंपनीसाठी हा पैसा वापरल्याचे समोर येईल. ज्यावेळी हा पैसा गोळा करण्यात आला त्यावेळी आम्ही ५ हजार रुपये टाकून निधी दिला आहे. पण हा सगळा पैसा किरीट सोमय्यांच्या कंपनीला गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

विक्रांत वाचवण्यासाठी नेव्हीतील काही अधिकाऱ्यांनीही रक्कम दिली. त्यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे. किरीट सोमय्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. त्यांना हा देश माफ करणार नाही. सध्याचे राज्यपाल हे भाजपशासित आहेत.

SCROLL FOR NEXT