Latest

परीक्षा दुपारी तीन वाजता… पेपर सकाळी 8 वाजताच लीक

दिनेश चोरगे

लखनौ; वृत्तसंस्था : परीक्षा दुपारी तीन वाजता असताना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलिस भरतीचा पेपर लीक झाल्यानंतर उत्तर प्रदेशात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बर्‍याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेश सरकारने पोलिस भरती काढून बेरोजगार तरुणांच्या आनंदात भर घातली होती.

वयामध्येही सवलत दिली, त्यामुळे वय निघून गेलेले तरुणही खूश झाले. कारण यानिमित्ताने त्यांना नोकरीची जणू संधी मिळाली होती. सुमारे 50 लाख तरुणांनी प्रत्येकी चारशे रुपये देऊन फॉर्म भरले. रेल्वे, टॅक्सी आणि मिळेल त्या वाहनाने तरुण भरतीच्या ठिकाणी पोहोचले. परीक्षा देऊन बाहेर पडल्यानंतर कष्टाळू उमेदवारांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण परीक्षा तीन वाजता असताना तत्पूर्वीच सकाळी आठ वाजता पेपर लीक झाला होता. याविरोधात तरुणांनी आंदोलन सुरू केले असून, परीक्षेत काहीच घोटाळा झाला नसल्याचे भरती बोर्डाकडून सांगण्यात येत आहे, हे विशेष! सर्वत्र टीका सुरू झाल्यानंतर मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आली.

SCROLL FOR NEXT