पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आगामी चित्रपट बडे मियां छोटे मियांच्या प्रमोशनसाठी लखनऊ पोहोचले होते. तिथे त्यांना पाहायला तुफान गर्दी झाली. एक धलक पाहण्यासाठी गर्दी अनियंत्रित झाली. दरम्यान, जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचे म्हटले जात आहे. (Akshay Kumar-Tiger Shroff )
अक्षय-टायगर लखनऊच्या घंटाघर येथे पोहोचले होते. ॲक्शन स्टंट दाखवताना दोन्ही स्टार्सने एरियल एन्ट्री घेतली. उपस्थित गर्दी त्यांना पाहून आरडोओरडा करू लागली. हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेते दोरीच्या सहाय्याने स्टंट करताना दिसले आणि स्टेजवर उतरले. खाली उभा असलेली गर्दी जोरजोरात ओरडू लागली.
रिपोर्टनुसार, दगडफेकीची ही घटना बाहेर घडली. त्यामुळे प्रमोशनल इव्हेंटमध्ये कोणताही अडथळा आला नाही. वातावरण असे अनियंत्रित झाले की, गर्दीने एकमेकांवर दगड आणि चप्पल फेकणे सुरु केले. व्हिडिओमध्ये चपला पसरलेल्या दिसत आहेत. अनियंत्रित गर्दीला शांत करण्यासाठी लाठीचा वापर करावा लागला.
बडे मियां छोटे मियां एक ॲक्शन चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. टीजरवरून अशे वाटते की, अक्षय आणि टायगर 'बडे मियां छोटे मियां'मध्ये आर्मी ऑफिसर्सच्य़ा भूमिकेत आहेत. हे दोघे एका खास मिशनवर आहेत. चित्रपटात खलनायकाची भूमिका साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन करत आहेत. पण, टीजरमध्ये त्यांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट १० एप्रिल रोजी ईदच्या निमित्ताने रिलीज होईल.