Latest

पुणे: पीएमपीला सोमवारी मिळाले दोन कोटींपेक्षा अधिक उत्पन्न,13 लाख प्रवाशांनी केला प्रवास

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीला सोमवारी एकाच दिवसात दोन कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. सोमवारी दिवसभरात 13 लाख प्रवाशांनी पीएमपी बसच्या माध्यमातून प्रवास केला, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून पीएमपीचा दैनंदिन उत्पन्नाचा टप्पा पार झाला आहे. पीएमपीच्या बस सेवेचा वापर प्रवाशांनी सोमवारी (दि.14) रोजी इतर दिवसांपेक्षा अधिक केल्याचे समोर आले आहे. इतर दिवशी पीएमपीला दिवसाला 1 कोटी 60 ते 70 लाखांच्या घरात उत्पन्न मिळते. मात्र, सोमवारी २ कोटी रूपये एवढे विक्रमी उत्पन्न पीएमपीला मिळाले आहे. या दिवशी १ हजार ६५७ बस संचलनात होत्या.

2016 नंतर पहिल्यांदाच 2 कोटीचा टप्पा पार…

पीएमपीला यापूर्वी ४ जानेवारी २०१६ रोजी २ कोटी रूपयांचे दैनंदिन उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर आता पीएमपी प्रशासनाला हा टप्पा पार करण्यात यश आले आहे.

SCROLL FOR NEXT