Latest

भोसरी : पीएमपी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये विसरलेली बॅग महिलेला केली परत

अमृता चौगुले

भोसरी : पीएमपी बसमध्ये विसरलेली बॅग वाहक व चालक यांनी संबंधित महिलेकडे सुपूर्द केली. बस चालक रितेष नरेंद्र गवई व वाहक विजय आण्णा मोरे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल बीआरटी स्थानकात दोघांचे कौतुक होत आहे. भोसरी ते मनपा (एमएच 14, सी डब्लू 1979) या बसमधून कल्पना डुकरे या प्रवास करत होत्या. बसचालक गवई व वाहक मोरे हे दोघे सकाळी साडे सातचा सुमारास मनपावरून निघाले होते. कल्पना डुकरे या वाकडेवाडी येथील एसटी बस स्थानकाजवळ उतरल्या. काही वेळाने त्यांचा लक्षात आले की आपल्या जवळील बॅग बसमध्ये विसरली. त्यांनी वाकडेवाडी येथून मनपा येथील वाहतूक कक्षाशी संपर्क साधला. संबंधित अधिकार्‍यांनी वाहक मोरे यांचाशी संपर्क साधत विचारणा केली.

त्यानंतर वाहक व चालक यांनी बसमध्ये बॅग असल्याचे सांगितले. तसेच, भोसरी बीआरटी बस स्थानकात बॅग जमा केल्याचे सांगितले. महिला प्रवासी भोसरीतील बीआरटी स्थानकात विसरलेल्या बॅगचे वर्णन स्थानक प्रमुख काळुराम लांडगे व विजय आसाडे यांना सांगितले. बॅगमध्ये महत्वाची कागदपत्रे, एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र व तीनशे रुपये रोख असा ऐवज होता. महिलेने वाहक, चालक यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणे बद्दल आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT