Latest

पुण्यात पीएमपीएमएल कंडक्टर-प्रवासी एकमेकांत भिडले, नंतर बस थेट पोलीस स्टेशनमध्ये

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल बसचे कंडक्टर आणि प्रवशाचा आपसात वाद झाला. त्यानंतर चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली. त्यामुळे सर्व प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. ही घटना सकाळी मोशी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवशाने मोशीपर्यंतचे पंधरा रुपयांचे तिकीट काढले. त्यानंतर त्याने पुन्हा एक दिवसाचा पन्नास रुपयांचा पास मागितला.

मात्र, गैरसमजातून कंडक्टरने पुन्हा मोशीपर्यंतचे तिकीट दिले. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी पर्यंत गेले. शेवटी भांडण मिटत नसल्याचं पाहून चालकाने बस मोशी पोलीस चौकीत नेली. तेथे पोलीस उपस्थित नसल्याने शेवटी बस भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्यामुळे अन्य प्रवाशांना तासाभर ताटकळत बसावे लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT