Latest

Budget 2023-24 Agriculture : सेंद्रीय शेतीसाठी PM प्रमाण योजना

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Budget 2023-24 Agriculture : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात कृषी विभागात महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यावेळी सेंद्रीय शेतीसाठी PM प्रमाण योजनेची निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली.

नैसर्गिक शेतीबाबत बोलताना सीतारामण म्हणाल्या, पुढील 3 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी मदत केली जाईल, यासाठी 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्रे स्थापन केली जातील, राष्ट्रीय स्तरावर वितरित सूक्ष्म खत आणि कीटकनाशक उत्पादन नेटवर्क तयार केले जातील.

पुढील 3 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी मदत केली जाईल, यासाठी 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्रे स्थापन केली जातील, राष्ट्रीय स्तरावर वितरित सूक्ष्म खत आणि कीटकनाशक उत्पादन नेटवर्क तयार केले जातील.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी २० लाख कोटी रुपये कृषी कर्ज वाटपाचे उदिष्ट्य ठेवले असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी प्रवेगक निधी गठित केला जाईल, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे.

Budget 2023-24 Agriculture : ओपन सोर्स, ओपन स्टँडर्ड, इंटरऑपरेबल पब्लिक गुड म्हणून शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार केल्या जातील. सर्वसमावेशक शेतकरी-केंद्रित उपाय सक्षम केले जातील आणि यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. मार्केट, कृषी उद्योग आणि स्टार्टअप्सला पाठबळ दिले जाईल, असे सीतारामन यांनी नमूद केले.

SCROLL FOR NEXT