Latest

Pm narendra modi: भारत-अमेरिका करारामुळे तरुणांना संधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भारत आणि अमेरिका दरम्यान आयसॅट करार झाला आहे. करारामुळे सेमी कंडक्टरपासून अंतराळ क्षेत्रात अनेक संधी निर्माण होतील. अनेक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करता येईल. मायक्रॉनसारख्या कंपनी भारतात येत आहे. तरुणांसाठी त्यामुळे नवनवीन संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी शुक्रवारी (दि.३० जून) केले. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दीपूर्ती सोहळानिमित्त आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.

आतापर्यंत एआय फिक्शन हे केवळ चित्रपटातून बघायला मिळायचे. पंरतु, ते आता 'न्यू नार्मल' बनले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे सर्व क्षेत्र युवा पीढीसाठी नवमार्ग प्रशस्त करीत आहे. भारताने नवीन सेक्टर सुरू केले आहे. भारताच्या विकास यात्रेत विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. जगभरातील लोक आज भारताची संस्कृती जाणू इच्छितात. दिल्लीत जगातील सर्वात मोठे हेरीटेज म्यूझियम (Pm narendra modi) बनवले जात असल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले,

पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या शैक्षणिक संस्था जगात एक वेगळी छाप उमटवत आहेत. भारतात मोठ्या संख्येत विद्यापीठ, महाविद्यालये उभारली जात आहेत. गत काही वर्षांत सातत्याने उभारण्यात येणारी आयआयटी,आयआयएम, एनआयटी, एम्ससारख्या संस्था नवभारताच्या उभारणीचा पाया आहे.

Pm narendra modi: दिल्ली विद्यापीठ भारताची सॉफ्ट पॉवर- पंतप्रधान

कुठल्याही देशाची विद्यापीठ आणि शिक्षणसंस्था त्यांच्या यशस्वीतेचे प्रतीक असते. दिल्ली विद्यापीठ एक विद्यापीठच नाही तर ही एक चळवळ आहे. विद्यापीठाने प्रत्येक चळवळीला जगले आहे, प्रत्येक चळवळीत प्राण फुंकले आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी विद्यापीठाचे कौतुक केले. भारताची सॉफ्ट पॉवर वाढत आहे. प्रत्येक विद्यापीठांना यासाठी आपले लक्ष निश्चित करावे लागेल. दिल्ली विद्यापीठ १२५ वा वर्धापन दिवस साजरा करतांना प्रथम क्रमवारीत येण्याचे लक्ष ठेवावे. यासाठी सातत्याने काम करावे लागेल, असे आवाहन देखील पंतप्रधांनी केले.

पंतप्रधानांची 'मेट्रोवारी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोचे टोकन घेवून आणि नियमांचे पालन करीत त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांनी सहप्रवासी तरुणांसोबत चर्चा देखील केली. ट्विटरवर पंतप्रधानांनी यासंदर्भात फोटो शेअर केले आहेत. पंतप्रधानांनी दिल्ली विद्यापीठासाठी लोक कल्याण मार्ग ते विश्वविद्यालय मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी लोक कल्याण मार्ग मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT