Latest

PM Modi On Ram Temple: रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी पीएम मोदींचा देशवासियांना ऑडिओ क्लिपद्वारे संदेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येत २२ जानेवारीच्या रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पीएम मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेपूर्वी पीएम मोदींकडून ११ दिवसांच्या विशेष धार्मिक विधीला आजपासून प्रारंभ झाला आहे. या सोहळासंदर्भातील संदेश पीएम मोदी यांनी ऑडिओ क्लिपद्वारे त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिला आहे. (PM Modi On Ram Temple)

पीएम मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अयोध्येतील रामललाच्या अभिषेकला अवघे ११ दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. अभिषेक करताना भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मला एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्या बाजूने विधीला प्रारंभ केला आहे, असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (PM Modi On Ram Temple)

ऑडिओ क्लिपची सुरुवात पीएम मोदी यांनी 'राम-राम' म्हणत केली आहे. यानंतर ते म्हणतात, 'आयुष्यातील काही क्षण दैवी आशीर्वादामुळेच वास्तवात बदलतात. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र भगवान श्री राम भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांनी राम नामाचा जयघोष सुरू आहे. राम भजनामध्ये अप्रतिम  माधुरी सौंदर्य आहे. 22 जानेवारीच्या त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची प्रत्येकजण वाट पाहत आहे, असे देखील पीएम मोदी म्हणाले.  (PM Modi On Ram Temple)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT