Latest

PM Modi Ayodhya Visit | अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेंना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आज अनेक विकास कामांचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान, त्यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी त्यांनी अयोध्येतील 'अयोध्या धाम जंक्शन' रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. (PM Modi Ayodhya Visit)

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे अमृत भारत ट्रेनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव हेही उपस्थित होते. (PM Modi Ayodhya Visit)

आयोध्येत नमो नमो… ! PM मोदींचा ८ किमी लांब 'रोड शो'

पीएम मोदी यांच्या हस्ते आज (दि.३०) आयोध्येत विविध विकास कामांचे लोकार्पण होत आहे. तत्पूर्वी पीएम मोदी आयोध्येत पोहचताच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींचे आयोध्येत आगमन होताच, फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत येथील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पीएम मोदी यांनी देखील ताफ्यातील गाडीतून हात उंचावत, नमस्कार करत लोकांना प्रतिसाद देत, जोरदार रोड शो केला आहे. (PM Modi Ayodhya Visit)

अयोध्येत विकास कामांचा धडाका

  • अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक उद्घाटन- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. 240 कोटींहून अधिक खर्च करून रेल्वे स्थानक विकसित करण्यात आले आहे. तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानक इमारत, लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजेच्या साहित्यांची दुकाने, क्लोक रूम, चाइल्ड केअर रूम, वेटिंग हॉल अशा सर्व आधुनिक वैशिष्ट्यांनी हे रेल्वे स्थानक सुसज्ज आहे.
  •  महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन- भारतीय मंदिर वास्तुकलेसारखी रचना असलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल भवनचे उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते झाले. या विमानतळाचे नाव 'महर्षी वाल्मिकी विमानतळ' असे असणार आहे. या विमानतळाचे बांधकाम अवघ्या २० महिन्यांच्या विक्रम वेळेत पूर्ण केले आहे, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) चे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या विमानतळासाठी ८२१ एकर जमीन उपलब्ध करून दिली, असे सरकारने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या विमानतळाच्या उभारणीसाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, फायर स्टेशन, कार पार्किंग आणि अलाईड सिटी-साइड पायाभूत सुविधांचा समावेश आहे

विमानतळ उद्घाटनानंतर आयोध्येतून इंडिगोच्या विमानसेवेला प्रारंभ

अयोध्येत २२ जानेवारीच्या रामल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणारच आहेत. पण त्या आधी आज त्यांनी अयोध्यावासीयांना विविध विकासकामांच्या उद्घाटनांची भेट दिली. अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन त्यांनी केले. सहा नवीन वंदे भारत रेल्वे गाड्या आणि दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांचे लोकार्पण त्यांनी केले. त्यांनंतर महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. भारतीय मंदिर वास्तुकलेसारखी रचना असलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल भवनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर अहमदाबाद ते अयोध्या आणि दिल्ली ते अयोध्या या इंडिगोच्या विमानसेवेला प्रारंभ होणार आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT