Latest

PM Modi: PM मोदींचे फिटनेस इन्फ्लुएंसरसोबत ‘श्रमदान’! दिला ‘स्वच्छते’चा संदेश (व्हिडिओ)

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: महात्मा गांधीजींच्या १५४ व्या जयंतीपूर्वी आज (१ ऑक्टो) देशभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. 'स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत केंद्रीय मंत्री आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून देशभरात श्रमदान केले जात आहे. फिटनेस इन्फ्लुएंसर (कुस्तीपटू) अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान पीएम मोदींनी आज श्रमदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अभियानात सहभाग घेत स्वच्छतेसोबत 'तंदुरुस्ती' चाही संदेश दिला. हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत 'X' वरून शेअर केला आहे.

पीएम मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज संपुर्ण देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे. अंकित बैयनपुरिया आणि मी ही तेच केले. केवळ स्वच्छता नाही,तर त्यापलीकडे, आम्ही 'तंदुरुस्ती' आणि 'कल्याण' या संकल्पनांचा देखील यामध्ये समावेश केला आहे. तसेच हे सर्व स्वच्छ आणि स्वच्छ भारताचे  संकेत आहे, असे देखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

पीएम मोदींनी सोशल मीडियावर अंकित बैयनपुरियासोबतचा ४ मिनिटे ४१ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते स्वच्छ आणि निरोगी भारताचा संदेश देत आहेत. सप्टेंबरच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी १ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते.

'स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी 'एक तारीख, एक तास, एक साथ' असा नारा दिला होता. आजच्या मोहिमेसाठी देशभरातील ६.४ लाख ठिकाणांची निवड करण्यात आली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी वेगवेगळ्या राज्यात झाडू हाती घेत स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT