Latest

आरटीओ संगम ब्रिज वगळता शहरात इतरत्र रिक्षांचा शुकशुकाट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बेकायदा बाईक टॅक्सीन विरोधात रिक्षा चालकांनी आक्रमक होत सोमवारी बेमुदत संप पुकारला आहे . या शहरातील 17 ते 18 रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले आहेत. या रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा संगम ब्रिज पुलापासून वाकडेवाडी एसटी स्टँड पर्यंत उभ्या केल्या आहेत त्यामुळे एक वेगळेच चित्र येथे पाहायला मिळत आहे.

संगम ब्रिज पासून तब्बल तीन ते चार किलोमीटर पर्यंत रिक्षाच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे जहांगीर रुग्णालय रस्त्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. तर शाहीर अमर शेख चौकात जुना बाजार मार्गे आणि आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या दिशेने जाणाऱ्या व आरटीओकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

रिक्षा संपात सहभागी झालेल्या संघटना

– महाराष्ट्र रिक्षा पंचायत
– बघतोय रिक्षावाला फोरम
– आम आदमी रिक्षाचालक संघटना पुणे शहर (जिल्हा)
– वाहतूक सेवा संघटना
– शिवनेरी रिक्षा संघटना
– अजिंक्य रिक्षा संघटना
– महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
– RPI रिक्षा वाहतूक आघाडी
– आशीर्वाद रिक्षा संघटना
– AIMIM रिक्षाचालक संघटना
– शिवा वाहतूक संघटना
– राष्ट्रीय एकता रिक्षा महासंघ

SCROLL FOR NEXT