Latest

पिंपळनेर : निर्यातबंदी उठल्याने कांदा उत्पादकांना दिलासा, सातशे रुपयांची झाली वाढ

अंजली राऊत

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील दहिवेल आणि पिंपळनेर येथील उपबाजार समितीत कांद्याला 1800 ते 2100 पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या आठवड्यात सरासरी प्रतिक्विंटल 1500 ते 1800 रुपये दर मिळाला होता. मात्र, भाव वधारल्याने कांद्याची आवक वाढली आहे.

निर्यातबंदीमुळे कांदा दर घसरल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. कमी भावाने कांदा विकावा लागला होता. मात्र, निर्यात बंदीमुळे कांदा दर घसरले. परिणामी शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागला. दहिवेल ते पिंपळनेर येथील कांदा बाजारात भाव-कमी जास्त दिसून येतो. शेतातून काढलेल्या कांद्याची दुसऱ्याच दिवशी विक्री केली जात असते. भाव मिळत असल्याने कांद्याची आवक वाढली आहे. मात्र आता कांद्यावरील निर्यात खुली झाल्याने क्विंटलमागे 500 ते 700 रुपयांनी दर वाढले आहेत. निर्यातबंदी उठल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव 500 ते 750 रुपयांनी वधारले आहेत.

पिंपळनेर खासगी बाजार समितीत शनिवार (दि.११) च्या तुलनेत सोमवारी (दि.१३) कांद्याला 1800 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. सरासरी 1500 ते 1700 प्रतिक्विंटल असा भाव होता. शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरून साठवणूक केली आहे. तर खरीप हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कांदा बाजारात विक्रीसाठी काढला आहे.

शेतकऱ्यांनी कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवक अधिक वाढण्याची शक्यता आहे. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत होता. कांद्याचे भाव खाली येऊन शेतकरी अडचणीत सापडला होता. सोमवार (दि.१३) रोजी पिंपळनेर जवळील देशशिरवाडे व खाजगी कांदा मार्केटमध्ये ब-यापैकी आवक झाली होती तर दहिवेल कांदा बाजारात 145 वाहनातून कांद्याची आवक झाली असली तरी खाजगी व उपबाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये तफावत दिसून येत आहे.

कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च येतो यासाठी कांद्याच नापासून दोन पैसे मिळू शकतात अन्यथा तो कर्जबाजारीच राहील. तरी सरकारने पूर्ण निर्यात धोरण खुले करावे व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्यावे. – दिनेश पंखेवाले, शेतकरी.

विक्रीसाठी येत असल्याने भाव टिकून आहेत. येणाऱ्या दिवसात पाऊस सुरू झाल्याने कांद्याचे भाव वाढतील, असा अंदाज आहे. सध्या गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी जात आहे. शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊनच कांदा विक्री करावा – प्रा.किरण कोठावदे व्यापारी पिंपळनेर.

SCROLL FOR NEXT