Latest

पुण्याकडे उड्डाणाच्या तयारीत असलेल्या वैमानिकाचा मृत्यू

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्याकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असलेल्या विमानाच्या वैमानिकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १७) घडली. मनोज सुब्रमण्यम (वय 40 वर्ष) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. इंडिगो एअरलाइन्समध्ये ते कार्यरत होते.

या घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानतळावरील बोर्डिंग प्रवेशद्वाराजवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यानंतर तातडीने बेशुद्ध अवस्थेतच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैमानिक मनोज सुब्रमण्यम यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी मेडिकल कॉलेज रुग्णालयात केली जाणार आहे. याविषयीची माहिती तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. इंडिगो एअरलाइन्सने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT