Latest

पिचड-आ. डॉ. लहामटे एकत्र दिसणार का?

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा : राजकीयदृष्टया एकमेकांचे कट्टर विरोध असलेले माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड व सुपूत्र माजी आ. वैभव पिचड यांचे कट्टर विरोधक आ. डॉ. किरण लहामटे यांचे फोटो एकाचं फ्लेक्सवर दिसत असल्याने ते एकत्र येणार का, असा सवाल केला जात आहे. राजूर ग्रामपंचायतीने डांगी जनावरांच्या प्रदर्शनानिमित्ताने हे फोटो टाकले असले तरी प्रदर्शनात एकाचं व्यासपीठावर माजी मंत्री व आजी – माजी आमदार एकत्र येणार का, असा प्रश्न जनसामान्य जनतेला पडला आहे. आजी – माजी आमदार एकच फ्लेक्सवर झळकल्याने येणार्‍या निवडणुकीत ते एकत्र येणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूरमध्ये डांगी देशी जनावरांचे व शेतीमालाचे प्रदर्शन सोमवार, मंगळवार, बुधवारी भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात डांगी प्रजातीच्या वळुंची निवड तसेच मोठ्या प्रमाणात डांगी व देशी जनावरे घेवून शेतकरी विकण्यास आणतात. हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येऊन डांगी वळू, बैलजोडीची निवड करून त्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. चॅम्पीयन म्हणून निवडल्या जाणार्‍या वळूस रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाते. अनेक ठिकाणांहून पाळणे, दुकाने, तमाशा, विविध विभागांचे माहिती केंद्र या प्रदर्शनात सहभागी होतात.

मोठ्या प्रमाणात लोक मोठी गर्दी करतात, परंतु डांगी जनावरांच्या प्रदर्शनामध्ये चॅम्पीयन म्हणून निवडलेल्या शेतकर्‍यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत निमंत्रण पत्रिका व फ्लेक्सवर माजी मंत्री मधुकराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड व विद्यमान आ. डॉ. किरण लहामटे यांचे नावे असल्याचे फ्लेक्स तालुक्यात झळकत आहेत, परंतु या कार्यक्रम प्रसंगी ते एकत्र उपस्थित राहणार का, असा प्रश्न अकोलेकरांंना पडला आहे.

महाराष्ट्र राज्यात शिदे- फडणवीस, पवार यांचे सरकार आहे,तर उपमुख्यमंत्री अजित पवार या राष्ट्रवादी गटाचे आ.डॉ.किरण लहामटे गटाच्या राजूर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच पुष्पा निगळे तसेच भाजपाचे माजी आ.वैभवराव पिचड गटाचे उपसरपंच सतोष बनसोडे सह 11 ग्रामपंचायत सदस्य आहेत, परंतु राजुर ग्रामपंचायतमध्ये पिचड – लहामटे गटाचे नेहमीच युद्ध कामावर खटके उडतात. अनेकदा आ. लहामटे ते पिचड यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हेही दाखल झाले, हे विशेष!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT