Latest

photo viral : ‘दिसतं तसं नसतं’ : ‘त्या’ समुद्रकिनार्‍यावर भले मोठे कोळी?, वास्तव मात्र वेगळेच..

Arun Patil

न्यूयॉर्क : सोशल मीडियाच्या भ्रामक दुनियेत काय दाखवले जाईल हे काही सांगता येत नाही. मागे एकदा लांब शेपटीचे काही रकून प्राणी धावत असतानाची चित्रफित उलटी फिरवून तिला डायनासोरची पिल्ली धावत असल्याचे भासवले गेले होते. रकूनच्या शेपट्या डायनासोरच्या उंच मानेसारख्या यामध्ये दिसत होत्या. एकंदरीत 'दिसतं तसं नसतं' याचे भान सोशल मीडिया पाहताना राखणे आवश्यक असते. आताही एका समुद्रकिनार्‍यावर भले मोठे कोळी असल्यासारखा फोटो (photo viral) व्हायरल झाला होता, पण त्याचेही वास्तव वेगळेच आहे!

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 62 वर्षांचे शेतकरी जॅन वोर्स्टर दक्षिण आफ्रिकेतल्या स्टील बे इथल्या त्यांच्या मूळ गावी वेस्टर्न केप समुद्रकिनार्‍यावर गेले होते. तिथेच त्यांनी अनेक फोटो काढले. त्या फोटोंची (photo viral) इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल आणि हे फोटो व्हायरल होतील, असं त्यांनाही कधी वाटलं नाही. फोटोत दिसणारी गोष्ट वेगळी असताना सोशल मीडियावर मात्र यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. समुद्रकिनार्‍यावरच्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा होत असताना सत्य मात्र काही वेगळे आहे.

समुद्रकिनार्‍यावर कोरफडीची अनेक मृत रोपटी पसरलेली होती. समुद्राच्या लाटा त्यावरून जात होत्या. जॅन यांना हे पाहिल्यानंतर फोटो क्लिक करण्याचा मोह आवरला नाही. हवामानबदल आणि वनसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हा फोटो (photo viral) काढला. तो फोटो पाहून नागरिक झाडांच्या संरक्षणाच्या बाबतीत विचार करतील, असं वाटत असताना सोशल मीडियावर मात्र या फोटोला वेगळंच काही तरी समजून त्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली.

फेसबुकवर फोटो (photo viral) पोस्ट केल्यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. एका सुपीक डोक्याच्या यूजरने त्याला 'सागरी स्पायडर' अशी कॅप्शन दिली. त्यानंतर या फोटोवरून अनेक अफवा पसरल्या. काहींनी तर फोटोत दिसणारी गोष्ट म्हणजे परग्रहावरचे जीव असल्याचं संबोधलं. अनेकांनी याला भूत-प्रेताची उपमा दिली! सोशल मीडियामुळे संशय कल्लोळ कसा निर्माण होतो याचे हे आणखी एक उदाहरण!

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT