Latest

शेतकऱ्यांवरील संकट वाढले ! वातावरणातील बदलामुळे पिकांवर कीड

अमृता चौगुले

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामधील शेतकरी मागील वर्षी अतिवृष्टी, तर यावर्षी दुष्काळसदृश परिस्थितीने हतबल झाला आहे. शेतातील पिके कशीबशी जगवली असताना या पिकांवर पडत असलेल्या विविध रोगांमुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पावसाळ्यात पाऊस पडला नाही आणि आता ढगाळ हवामान झाल्याने फळबागांसह, मका, तूर आदी पिकांवर करपा व तांबेरा व किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. वाल्हे परिसरातील शेतकरी शेतीसह दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात.

जनावरांना ओला चारा म्हणून मका, कडवळ आदी चारा पिके करतात. मागील काही दिवसांपासून मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही अळी मक्याची पाने खाऊन पिकाच्या कोब्यामध्ये राहिल्याने व ती मका चार्‍यांमधून जनावरांच्या पोटामधे गेल्यावर जनावरांचे पोट फुगून जनावरे दगवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे येथील शेतकरी मका पिकावरील लष्करी अळीचा नाश करण्यासाठी औषधफवारणी करताना दिसत आहेत. नुकतेच साखर कारखाने सुरू करण्यात आल्याने उसाचे वाडे हा एक पर्याय शेतकरी वर्गासमोर आहे. मात्र, दुधाला महागाईच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळत नसल्याने 10 उसाचे वाढे असलेला भेळा शेकडा 300 रुपये, तर 20 वाड्याच्या भेळा शेकडा 600 रुपयांना विकत घेऊन जनावरांना टाकणे शेतकर्‍यांना परवडत नसल्याचे शेतकरीवर्गाने सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT