Latest

Village of Blind People : ‘या’ गावात माणसं आणि प्राणीही आहेत अंध!

Arun Patil

मेक्सिको सिटी : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी गावं आहेत. जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गाव अशी काही गावं लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. मेक्सिकोमध्ये टिल्टेपक नावाचे एक गाव आहे. ते 'व्हीलेज ऑफ ब्लाईंड पिपल' म्हणजेच 'अंध लोकांचे गाव' म्हणूनच ओळखले जाते. या गावात केवळ माणसंच नव्हे तर अनेक प्राणीही अंध आहेत! Village of Blind People

या गावात जेपोटेक समुदायातील लोक राहतात. तिथे बाळ जन्म घेते त्यावेळी ते पूर्णपणे ठीक असते. मात्र, जन्मानंतर काही दिवसांनी त्याची द़ृष्टी जाते Village of Blind People व ते इतरांसारखे अंध होते. गावातील हे रहस्य आजही कुतुहलाचाच विषय बनून राहिलेले आहे. अर्थातच तिथे याबाबत अंधश्रद्धाही आहेत. गावातील लोक तेथील 'लावजुएला' नावाच्या झाडाला जबाबदार मानतात.

या झाडाला पाहताच मनुष्यांसह पशू-पक्षीही अंध होतात Village of Blind People असे त्यांचे म्हणणे. मात्र, वैज्ञानिकांना हे मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तेथील अंधत्वामागे काही विषारी माशा जबाबदार आहेत. ही विशेष प्रकारची माशी चावल्यानंतर द़ृष्टी जाते असे त्यांचे म्हणणे आहे. गावातील सगळेच लोक झोपड्यांमध्ये राहतात. गावात सुमारे 70 झोपड्या आहेत. त्यामध्ये 300 लोक राहतात. हे बहुतांश अंधच आहेत.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT