Latest

Patna High Court: बलात्कार प्रकरणी कुत्र्याची ‘साक्ष’ गृहीत धरून सुनावलेली शिक्षा हायकोर्टाने केली रद्द

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्निफर डॉग पुराव्याच्या आधारे आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने रद्द करत, संबंधित आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. आज (दि.२२) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासादरम्यान स्निफर कुत्रा केवळ संबंधित आरोपी व्यक्तीच्या घरात घुसल्यावरून वस्तुस्थिती सिद्ध होत नसल्याचे सत्र न्यायालयाला दिलेल्या निकालावरून फटकारले. तसेच उच्च न्यायालयाने या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. (Patna High Court)

संबंधित २०१९ च्या या घटनेत एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसोबत मंदिरात गेली होती. दरम्यान नागपंचमी सणानिमित्त यात्रा सुरू होती, तेव्हाच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मंदिराजवळील परिसरात तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणात संबंधित आरोपीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र पाटणा उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करत, आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. (Patna High Court)

सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष कुमार आणि न्यायमूर्ती आलोक कुमार पांडे यांच्या खंडपीठाने हे प्रकरण हाताळले होते. मात्र या खंडपीठाने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आणि "कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचा विचार न करता" आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली त्याबद्दल पाटण उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने फटकारले आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, न्यायिक व्यवस्थेला स्निफर कुत्र्याच्या कौशल्यावर अवलंबून राहणे परवडणारे नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Patna High Court)

पुढे न्यायालयाने म्हटले आहे की, सत्र न्यायालय हे कसे मान्य करू शकते की, कुत्र्याने आरोपीच्या घरात प्रवेश करताना कोणती चुक केली नसावी. तसेच तपासादरम्यान या केसशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीच्या घरात देखील कुत्रा घुसल्याचे पुरावे दिले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र न्यायालयाने कुत्र्यांच्या घ्राणेंद्रियाचे फायदे (वासाची भावना) आणि त्यामुळे पोलिसांनी तपासात होत असलेली मदत मान्य केली आहे. न्यायालयाने पुढे म्हटले की, जरी स्निफर डॉगची मदत पोलिसांच्या तपासासाठी एक प्रारंभिक बिंदू असू शकते, तरीही तो "एवढा मजबूत पुरावा म्हणून घेतला जाऊ शकत नाही" असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT