Latest

पाटणा : गंगा नदीत बोट उलटली; ६ जण बुडाले

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील पाटणा येथे गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जण बुडाले. १५ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. बुडालेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. ही घटना आज (दि. २३) सकाळी घडली. ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

बोटीत एकूण २१ जण होते, त्यापैकी १५ जणांना स्थानिकांनी सुखरूप सुटका केली.  ६ जण बेपत्ता आहेत. गोताखोरांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. दिघा येथील जेपी सेतूच्या १० क्रमांकाच्या खांबाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती एसडीआरएफ टीमला देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

SCROLL FOR NEXT