Latest

अबब! पॅटागोनियाच्या संस्थापकांनी संपूर्ण कंपनी पर्यावरण रक्षणासाठी केली दान, म्हणाले ”आता पृथ्वी हा एकमेव भागधारक”

Arun Patil

पुढारी ऑनलाइन डेस्क : बिल गेट्सपासून अझिम प्रेमजी यांच्यापर्यंत अनेक अब्जाधीश उद्योजकांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजकार्यासाठी दान केलेला आहे. आता तर अमेरिकेतील यव्होन चोईनार्ड यांनी पर्यावरणासाठी आपली सर्वच संपत्ती, आपली पूर्ण कंपनीच दान केली आहे. पॅटागोनिया फॅशन रिटेलर ब्रॅंडचे संस्थापक यव्होन चोईनार्ड यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अशाप्रकारे आपल्या कंपनीचे शेअर्स दान केले आहेत.

चोईनार्ड यांनी पॅटागोनियाच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या एका खुल्या पत्रात म्हटले आहे की 'पृथ्वी आता आमचा एकमेव भागधारक आहे.' 83 वर्षीय यव्होन चोईनार्ड यांच्या या ब्रॅंडचे मूल्य 3 अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी हा ब्रॅंड एक तर विकला असता किंवा सार्वजनिक केले असते, त्याऐवजी त्यांनी वेगळा मार्ग पत्करला आहे. अमेरिकेच्या या अब्जाधीशांनी 50 वर्षांपूर्वी व्यवसाय सुरू केला होता आणि आज तो चॅरिटीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. यव्होन चोईनार्ड यांच्यासोबतच त्यांची पत्नी व मुलांनीही त्यांचा हिस्सा दान करण्याची घोषणा केली आहे. पृथ्वी वाचवण्यासाठी कंपनी विकण्याऐवजी किंवा सार्वजनिक करण्याऐवजी यव्होन चोईनार्ड कंपनीला ट्रस्ट किंवा एनजीओकडे हस्तांतरित करीत आहेत.

कंपनीचे सर्व कॉर्पोरेट महसूल हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी काम करणार्‍या गटांना दान केले जाईल असे सांगण्यात येत आहे. 'नाऊ अर्थ इज अवर सोल शेअरहोल्डर' या मथळ्यासह कंपनीच्या वेबसाईटवरील एका पत्रात, यव्होन चोईनार्ड यांनी म्हटले की व्यवसायात पुनर्गुंतवणूक केल्यानंतर आम्ही जे पैसे कमावतो ते दरवर्षी संकटाशी लढा देण्यासाठी लाभांश म्हणून वापरले जाईल. आमची कंपनी आपला पैसा इतरांच्या आरोग्य आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी वापरेल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT