पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील आगामी मालिका 'पश्मिना – धागे मोहब्बत के' ही एक आगळीवेगळी प्रेमकथा ठरणार आहे. जिचे कथानक काश्मीरच्या जादुई निसर्गरम्य वातावरणात घडते अन् तिचे चित्रीकरणही तेथेच झालेले आहे अशा प्रकारची दूरचित्रवाणीवरील ही पहिलीच मालिका असेल. पश्मिना मालिका दोन वेगवेगळ्या मान्यता असलेल्या व्यक्तींमधील प्रणयकथा पडद्यावर जिवंतपणे साकारते. मोठ्या पडद्यावरील सिनेमॅटिक अनुभव छोट्या पडद्यावर आणत या मालिकेत प्रभावी अभिनेत्यांची मांदियाळी आहे. त्यातच आता निशांत मलकानी हा प्रमुख भूमिकेत झळकणार असून तो नुकताच मालिकेच्या कलाकार मंडळींत आला आहे.
मालिकेत निशांत हा राघव या एका चाणाक्ष उद्योगपतीची भूमिका साकारत आहे. त्याला कामाचे प्रचंड व्यसन असून प्रेमासारख्या संकल्पनांवर त्याचा विश्वास नाही.
काश्मीरच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर राघवच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळते जेव्हा पश्मिनासोबत त्याचा सामना होतो. तिच्या चेहऱ्यावरील जोश आणि स्वच्छंदतेने भरलेला प्रेम आणि जीवनाप्रतीचा दृष्टिकोन पाहून राघवला आपल्या मान्यता पुन्हा एकदा तपासून घेण्याची गरज पडते. काश्मीर खोऱ्याच्या नितांतसुंदर पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रेमाची कहाणी उलगडत असताना राघव स्वत:ला अशा भावनांच्या चक्रीवादळात बुडून गेल्याचे पाहतो, ज्यांचा अनुभव त्याने यापूर्वी कधीही घेतलेला नव्हता.
मालिकेत राघव कौलची व्यक्तीरेखा चितारत असलेला अभिनेता निशांत मलकानी म्हणाला की, 'राघवचे पात्र साकारणे माझ्यासाठी खरोखरीच शानदार होते. त्याची जडणघडण जणू एखाद्या किचकट कोड्यातील एकेक साल सोलून काढण्यासारखे आहे. तेथे जे जगापासून आपल्या वास्तविक स्वरूपाचे रक्षण करत असतो. या व्यक्तिरेखेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रवास अद्भूत राहिलेला आहे. मालिकेत तो उत्क्रांत होताना बघणेही प्रेक्षणीय आहे. श्वास रोखून धरणाऱ्या काश्मीरच्या सुंदर पार्श्वभूमीवर मालिकेचे चित्रीकरण होणे ही या सर्वांवरील वरची कडी होती. खरोखरीच हे एखाद्या स्वप्नात जगण्यासारखे आहे. प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात पडतील अशी मला प्रामाणिक आशा आहे. कारण आम्ही तन, मन, धनाने आमचे सर्वस्व या मालिकेत ओतले आहे.'