Latest

Pillu Bachelor : पार्थ भालेराव- सायली संजीवचा ‘पिल्लू बॅचलर’ ‘या’ दिवशी भेटीला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : नावातूनच उत्सुकता निर्माण करणारा 'पिल्लू बॅचलर' हा नवा चित्रपट दिवाळीनंतर चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'पिल्लू बॅचलर' ( Pillu Bachelor ) हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

संबंधित बातम्या 

वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेशा मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपटाची निर्मिती तानाजी घाडगे यांनी यापूर्वी केली आहेत. ( Pillu Bachelor ) चित्रपटात गीतलेखन मंगेश कांगणे यांनी तर संगीत दिग्दर्शन चिनार महेश यांनी केलं आहे. तर छायांकन सूर्या मिश्रा यांनी आणि अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार आहेत.

विनोदी शैलीत एक हलकी -फुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नावावरून प्रेमकथा असल्याचा अंदाज बाधता येतो, पण तरीही कथा नेमकी काय असेल? यांचे कुतूहल चाहत्यांच्यात आहे. चित्रपटातील उत्तम कलाकारांच्या भूमिका, उत्कृष्ट गाणी आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या या चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी भेटीला येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT