Latest

परभणी : मासोळी नदीला पूर आल्याने कौडगावसह ६ गावाचा संपर्क तुटला

अमृता चौगुले

परभणी; पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड – तालुक्यात मागील सहा दिवसापासून संततधार सुरू असून कौडगाव येथील मासोळी नदीस पूर आला आहे. यामुळे कवड कौडगावसह ६ गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.

तालुक्यातील कौडगाव येथील मासोळी नदीच्या पुलाची उंची साधारणतः पाच फूट एवढीच असल्याने दरवर्षी पूर आल्यास येथील वाहतूक नित्य नियमाने बंद पडते. मागील सहा दिवसापासून संतत धार सुरू असल्याने मासोळी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे कवडगावसह धरमनगरी, वैद्यवाडी, खंडाळी तांडा, इळेगाव व खंडाळी या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी (दि.१३ जुलै) सायंकाळपासून कोडगाव येथील मासोळी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.

मासोळी नदी पुलाची उंची वाढवण्याची मागणी

मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील कौडगाव येथील मासोळी नदीवरील पुलाची उंची वाढवण्याचे नागरिकांची मागणी आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाल्यास पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे असल्याने नागरिकांची गैरसोय होती. मात्र याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी लक्ष देण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नसल्याने कौडगावकर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे

SCROLL FOR NEXT