Latest

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही नंदनवन फुलावे : ना. जयंत पाटील

अविनाश सुतार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नंदनवन फुलले आहे. त्याप्रमाणे विदर्भातही फुलावे, यासाठी शेतकर्‍यांनी या अभ्यास दौर्‍यातून मिळणार्‍या माहितीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचा पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचा विशेष प्रकल्प तसेच गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील शेतकर्‍यांचा 'शेतकरी समृध्दी'अभ्यास दौरा सध्या सुरू असून या दौर्‍याने इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी ना. जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेवून या दौर्‍यातील शेतकर्‍यांशी संवाद साधला.

ना. जयंत पाटील म्हणाले, विदर्भातून अभ्यास दौर्‍यावर आलेल्या शेतकर्‍यांनी सर्व गोष्टींची बारकाईने पाहणी करावी. तसेच तज्ज्ञ शेतकर्‍यांच्या शेतीला भेटी देऊन ते राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी. शासन विदर्भाच्या विकासासाठी शाश्वत सिंचनावर भर देत आहे. गोसी खुर्द प्रकल्प हा त्याचेच एक उदाहरण असून गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांनी या अभ्यास दौर्‍यातून अनुभव, ज्ञान घेवून आपल्याही भागात या पध्दतीचे प्रयोग करावेत.

उसाची शेती किती उत्तमरीत्या करता येते याचे उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आहेत. ज्यावेळी आपण या भागात दौरा कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की, या भागातील शेतकरी हा स्वबळावर समृध्द झाला आहे. स्वत: कष्ट करुन, स्वत: कर्जे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर शासनाने टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सारख्या उपसा सिंचन योजना राबवून जास्तीत- जास्त शेती ओलिताखाली आणली आहे. सांगली जिल्ह्यात ऊस शेतीबरोबरच येथील कष्टकरी शेतकर्‍यांनी द्राक्ष, डाळिंब अशा फळबागा मोठ्याप्रमाणात उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर आता अंबा पिकाचेही मोठ्याप्रमाणात लागवड केली जात आहे. तसेच शेतीमध्ये नवीन प्रयोगही येथील शेतकरी करत यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता अशिष देवगडे, गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंत जगत टाले, मुंबई पिपल्स इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सुरेश महिंद, सांगली जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव माने तसेच नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील दौर्‍यात सहभागी असणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT