Latest

Main Atal Hoon Trailer : पंकज त्रिपाठीच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, नेटकरी म्हणाले, ‘मोये मोये’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनावर आधारित चित्रपट मैं अटल हूं चा ट्रेलर रिलीज झाला. (Main Atal Hoon Trailer ) या चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पंकज त्रिपाठीला ये मास्टरपीस है अशी कॉमेंट दिली तर आणखी काही नेटकऱ्यांनी मोये मोये असे लिहित पंकजच्या अभिनयाचे गोडवे गायले. (Main Atal Hoon Trailer)

संबंधित बातम्या –

हा ट्रेलर शेअर करत पंकज त्रिपाठीने इन्स्टाग्रामवर लिहिलं, ज्या नेत्याला तुम्ही ओळखता, त्या व्यक्तीला तुम्ही नाही ओळखत. प्रस्तुत आहे श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या असाधारण जीवनाची एक झलक. Main ATAL Hoon चा ट्रेलर आता आला आहे! १९ जानेवारी २०२४ चित्रपटगृहात दाखल होईल.'

हा ट्रेलर पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं, रवी जाधव यांचे दिग्दर्शन एक सिनेमाई मास्टरपीस आहे. ते कुशलतापूर्वक अटल बिहारी वाजपेयीची कहाणी एक शालीनता आणि प्रामाणिकतेसोबत जीवंत करतात. दुसऱ्या युजरने लिहिलं, हा एक चित्रपट नाही तर अटलजींच्या प्रती सन्मान खरी श्रद्धा आहे. मी मनापासून आभार मानतो, पंकज जी आणि त्यांची संपूर्ण टीमला जय हिंद जय भारत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT