Latest

अमेरिकेत पॅलेस्टिनी वंशाच्या तीन तरुणांवर गोळीबार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील बर्लिंग्टनमध्ये पॅलेस्टिनी वंशाच्या तीन तरुणांवर गोळीबार झाल्‍याची घटना समोर आली आहे. तिघांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून, यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. द्वेषातून हा गुन्‍हा घडला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे, असे वृत्त 'द न्‍यूयाॅर्क टाइम्‍स'ने दिले आहे.

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमासमध्‍ये एक महिन्याहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. यामध्‍ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेत पॅलेस्टिनी वंशाच्या तीन तरुणांवर झालेला हल्‍ला द्वेषातून झाला असल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे.आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना हल्ल्याची माहिती देण्‍यात आली असल्‍याचे व्हाईट हाऊसने म्‍हटले आहे. ( Palestine origin Three man shot in America )

या हल्‍ल्‍याबाबत माहिती देताना बर्लिंग्टन पोलिस प्रमुख जॉन मुराद यांनी सांगितले की, शनिवार २५ नोव्‍हेंबरच्‍या सायंकाळी व्हरमाँट विद्यापीठाजवळ थँक्सगिव्हिंग हॉलिडे सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. पॅलेस्टिनी वंशाचे तीन तरुणही येथे आले. एका अमेरिकन व्यक्तीने युनिव्हर्सिटी कॅम्पसजवळ आपल्या बंदुकीने त्या तरुणांवर गोळ्या झाडल्या. आरोपींनी सुमारे चार राऊंड फायर केले होते. गोळीबारानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. जखमी झालेल्‍या तिन्ही तरुणांचे वय वीस वर्षे आहे. तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे.

'एफबीआय' देखील तपास करू शकते

तीन तरुणांवर झालेल्‍या गोळीबार द्वेषावर आधारित हल्ला असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. आम्ही फेडरल एजन्सींच्या संपर्कात आहोत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. एफबीआयने या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्याचे म्हटले आहे, असेही जॉन मुराद यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT