Latest

Palak Tiwari: ‘सलमानचे ड्रेसबाबत खूपचं नियम’, पलकने उघडले होते रहस्य, आता दिलं स्पष्टीकरण

स्वालिया न. शिकलगार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : पलक तिवारीने सेटवरील सलमान खानच्या ड्रेसबाबतच्या नियमांचा खुलासा केला होता. पण, आता तिने स्पष्टीकरण देत म्हटलंय की, तिच्या बोलण्याचा वेगला अर्थ काढण्यात आलाय. सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मधून पलक तिवारी बॉलीवूड डेब्यू करत आहे. तिने केलेल्या विधानामुळे पलक चर्चेत आलीय. पलकने खुलासा केला होता की, सलमान खानने नियम बनवले आहेत की, सेटवर मुली कोणत्या प्रकारच्या आऊटफिट्समध्ये असतील. पण या विधानावर स्पष्टीकरण देत तिने आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.

पलक म्हणाली, "हे खरचं चुकीचं समजण्यात आलं. मला केवळ इतकं म्हणायचं आहे की, मी एक स्वत:साठी काही गाईडलाईस तयार केलेत की, लोकांसमोर कोणते कपडे गालायचे. खासकरून माला सीनियर असणाऱ्यांसमोर. सलमान सर निश्चितपणे त्य़ापैकी एक आहेत."

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

पलकने सेटवर सलमान खानच्या नियमांबाबत म्हटले होते की, ती पहिल्यांदा सलमान खानसोबत काम करत नाहीये. ती 'अंतिम: द फायनल ट्रुथ'मध्येही दिसली होती. ती म्हमाली-जेव्हा मी 'अंतिम' मध्ये सलमान सरसोबत होते, तेव्हा सलमान सरांचा एक नियम होता की, कोणत्याही मुलीचा सेटनर ड्रेसची नेकलाईन वर असायला हवी. सेटवर मुलींनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. तेव्हा माझ्या आईने मला सेटवर जाताना पाहिले. तेव्हा मी प्रॉपर शर्ट, जॉगर्स आणि कवर्ड कपडे परिधान केले होते. आई म्हणाली, 'तू कुठे चाललीस? तू इतके चांगले कपडे घातलेस?' मी म्हमाले, सलमान सरांच्या सेटवर चालले. ती म्हणाली, 'वा, खूप छान."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT