Latest

मोठी बातमी : पाकिस्‍तानी गुप्‍तहेर संघटनेच्‍या एजंटला मेरठमध्‍ये अटक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानची गुप्‍तहेर संघटना 'आयएसआय'च्‍या एजंटला मरेठमध्‍ये अटक करण्‍यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. सत्येंद्र सिवाल असे त्‍याचे नाव आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. ( Pakistani ISI agent arrested from Meerut )

हापूर येथील मूळ रहिवासी असणार्‍या सत्येंद्र सिवाल हा २०२१ पासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासात कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयातही त्‍याने काम केले आहे. उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाला मॉस्कोमधील भारतीय दूतावासात कार्यरत असलेल्या आयएसआय एजंट सत्‍येंद्र सिवाल याच्‍याविषयी माहिती मिळाली होती. पथकाने त्‍याची चौकशी केली. चौकशीत त्‍याने दिलेली उत्तर असमाधानकारक होती. अखेर त्‍याने हेरगिरीची कबुली दिली. त्याला मेरठमध्ये अटक करण्यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय अधिकार्‍यांना पैशाचे आमिष

'एटीएस'ने केलेल्‍या चौकशीत सिवालने कबुली दिली आहे की, तो भारतीय लष्कर आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती पाकिस्‍तानला देण्‍यासाठी  भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवत असे." भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार यांची महत्त्वाची आणि गोपनीय माहिती ISI हँडलर्सना दिल्याचा आरोपही त्‍याच्‍यावर आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT