Latest

Tarek Fatah : ‘मी भारताचा सुपूत्र’ म्हणणारे पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांचे निधन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक आणि स्तंभलेखक तारिक फतेह (Tarek Fatah) यांचे निधन झाले आहे. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची मुलगी नताशा हिने ट्विट करून दिली. ते ७३ वर्षांचे होते.

नताशा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'पंजाबचा सिंह, भारताचा सुपूत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्याचा पुरस्कर्ता, न्यायासाठी लढणारा, दीन-दलितांचा आवाज, तारिक फतेह यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत तारिक फतेह (Tarek Fatah) यांनी पेटवलेली क्रांतीची मशात पेटत राहील.'

कोण होते तारिक फतेह?

तारिक फतेह हे अनेकदा दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. ते स्वतःला भारताचे सुपुत्र म्हणायचे. त्यांचे कुटुंब मुंबईचे होते, परंतु फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले. 20 नोव्हेंबर 1949 रोजी कराचीमध्ये जन्मलेले तारिक 1987 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून ते तिथेच राहत आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यासोबतच ते रेडिओ आणि टीव्हीवर समालोचनही करायचे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT