Latest

Mahira Khan Wedding : पाकिस्तानी अभिनेत्री माहिराने दुसऱ्यांदा केले लग्न

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान रविवारी तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्न केले. (Mahira Khan Wedding) रईसमध्ये शाहरुख खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने मुख्य भूमिका साकारली होती. ती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली. एका बिझनेसमनसोबत तिने विवाह केला आहे. माहिराच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Mahira Khan Wedding)

माहिरा खान तब्बल ५ वर्षापासून त्या बिझनेसमनला डेट करतेय. त्या बिझनेसमनचे नाव आहे-सलीम करीम. नववधूचा पोषाख लाईट ब्ल्यू कलरचा होता. यावेळी ती भावूक होऊन रडताना दिसली. तिचा मॅनेजर अनुशय तलहा खान यांनी तिचा लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

photos – mahiraheaven insta वरून साभार

माहिरा खानने लाईट ब्ल्यू कलरचा लेहेंगा आणि चोली परिधान केली होती. तिची लाँग मॅचिंग चुनरी लक्षवेधी ठरली. तर सलीमने ब्लॅक शेरवानी घातली होती. त्यावर लाईट ब्ल्यू फेटा (पगडी) बांधली होती. व्हिडिओत सलीम माहिराची चुनरी उचलताना दिसतो. तसेच आलिंगन देताना दिसतो.

SCROLL FOR NEXT