Latest

Pakistan fuel crisis : पाकच्या आर्थिक तंगीचा परिणाम लष्करावरही!

Arun Patil

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या आर्थिक तंगीचा परिणाम त्यांच्या लष्करावर पडत असल्याचे समोर आले आहे. युरेशियन टाईम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराकडे इंधनाची चणचण (Pakistan fuel crisis) असल्याने येत्या महिने म्हणजेच डिसेंबरपर्यंत कोणतेही लष्करी ड्रील न करण्याचा निर्णय घेतला आहे.

लष्करी प्रशिक्षणचे संचालक जनरल यांनी सर्व विभागांना एक पत्र लिहिले असून यामध्ये इंधनचा कमी साठा असल्याने लष्करी संचलन घेतले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. इंधनाच्या राखीव कोट्याचा वापर लष्कराच्या नेहमीच्या कामांसाठी केला जाणार आहे. लष्करी तज्ज्ञ आणि भारतीय लष्कराचे निवृत्त कर्नल दनवीर सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या लष्करी अभ्यासासाठी टी-80 या रणगाड्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

या रणगाड्यांसाठी प्रति किलोमीटर दोन लिटर इंधनाचा वापर केला जातो. अशातच लष्करी संचलनासाठीही मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज आहे. पाकिस्तानच्या ढासळत चाललेल्या अर्थव्यस्थेमुळे लष्कराला इंधन मिळणे कठीण होऊन बसले आहे. जुलैमध्ये पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने 260 रुपयांचा आकडा पार केला आहे. (Pakistan fuel crisis)

खाद्यान्न मिळत नसल्याची तक्रार

केवळ इंधन नाही तर या वर्षीच्या सुरुवातीला खाद्यान्न मिळत नसल्याची तक्रार पाकिस्तानी लष्कराने केली होती. याबाबत लष्कराने सरकारकडे ओरडही केली होती. गेल्या वर्षी पाकिस्तानी लष्कराला कमी फंडिंग झाल्यामुळे दर शुक्रवारी लष्करी वाहन न वापरण्याचे आवाहन सैनिकांना केले होते. वीज आणि गॅसचा कमी वापर करण्याचा सल्ला अधिकार्‍यांनी सैनिकांना दिला होता.

SCROLL FOR NEXT