Latest

Pakistan Suicide Blast : पाकिस्तानमधील आत्मघाती बॉम्बस्फोटामागे इसिसचा हात!

रणजित गायकवाड

पेशावर, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये एका राजकीय सभेदरम्यान झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात या आत्मघातकी हल्ल्यामागे इसिस या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पाकिस्तान पोलिसांनी दिली आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बजाऊर आदिवासी जिल्ह्याची राजधानी असलेल्या खार येथे जमियत उलेमा-इ-इस्लाम-फझल (जेयूआय-एफ) पक्षाच्या कार्यकर्त्यांचे रविवारी संमेलन होते. त्यावेळी दुपारी 4 वाजता एक आत्मघातकी स्फोट झाला. ज्यात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका येऊन पोहचल्यानंतर, घाबरलेले लोक स्फोटस्थळी गोळा होत असल्याचे दूरचित्रवाहिनीवरील दृश्यांत दिसून आले. स्फोट झाला, त्यावेळी पाचशेहून अधिक लोक संमेलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, सोमवारी पालिस्तान पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू असून घटनास्थळावरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यावे सांगितले, प्राथमिक तपासानुसार यामागे आयएसआयएस (ISIS) संघटनेचा हात आहे, असेही पोलिसांच्या हवाल्याने जिओ न्यूजने वृत्त दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, 'आत्मघाती हल्लेखोराविषयी माहिती घेतली जात आहे, तर बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. याप्रकरणात तीन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी नजीर खान यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT