Latest

PAK vs NZ : पाकिस्तानची न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत विजयी आघाडी

Arun Patil

कराची, वृत्तसंस्था : इमाम-उल-हक (90) व कर्णधार बाबर आझम (54) यांच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PAK vs NZ) सलग तिसर्‍यांदा धोबीपछाड केला आणि 5 सामन्यांच्या या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. येथील तिसर्‍या वन डे लढतीत पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 287 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 49.1 षटकांत सर्वबाद 261 धावांमध्येच गुंडाळला गेला.

पाकिस्तानतर्फे सलामीवीर इमाम-उल-हकने 107 चेंडूंत 90 धावांची आतषबाजी केली तर बाबर आझमने 54 धावांचे योगदान दिले. विजयासाठी 288 धावांचे कडवे आव्हान असताना कोल मॅकोनीने नाबाद 64 धावा फटकावल्या. त्याने यादरम्यान 36 चेंडूंत अर्धशतक साजरे करण्याचा पराक्रमही गाजवला. पण, यानंतरही किवीज संघ विजयापासून दूरच राहिला. न्यूझीलंडचा हा पाकिस्तानविरुद्ध 2011 नंतरचा पहिलाच मालिका पराभव आहे. (PAK vs NZ)

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तानने बड्या धावसंख्येचा पाठलाग करत सलग दोन विजय मिळवले होते. विजयाचा हाच धडाका येथेही कायम राखत यजमान संघाने मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT