Latest

PAK vs NZ : टीम साउदीने रचला नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला न्‍यूझीलंडच्‍या पहिला खेळाडू

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारी (१३ जानेवारी) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात न्‍यूझीलंडच्‍या संघाने दोन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीने तीन बळी घेतले. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) न्यूझीलंडसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. अशी कामगिरी करत साउदीने माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीला मागे टाकले आहे. (PAK vs NZ)

साउदीने ३५१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७९७ विकेट्स आहेत. त्याच्या नावावर ९० कसोटींमध्ये ३५३ विकेट्स, १४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २१० विकेट्स आणि १०७ टी-20 सामन्यांमध्ये १३४ विकेट्स आहेत. न्‍यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरी याने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६९६ विकेट घेतल्या आहेत. (PAK vs NZ)

फखर जमानने झळकावले शतक

न्यूझीलंडच्या संघाने २००८ नंतर प्रथमच पाकिस्‍तानमध्‍ये वनडे मालिका जिंकली आहे.  तिसर्‍या वनडेमध्‍ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी ५० षटकांत नऊ गडी गमावून २८० धावा केल्या.  फखर जमानने १२२ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याचे हे कारकिर्दीतील आठवे वनडे शतक होते. मोहम्मद रिझवानने ७७ आणि नवोदित आगा सलमानने ४५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या.

विल्यमसन, कॉनवे आणि फिलिप्स यांनी झळकावली अर्धशतके

२८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने २०५ धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. इथून पाकिस्तानचा संघ सामना जिंकेल असे वाटत होते. केन विल्यमसनने ५३ आणि डेव्हन कॉनवेने ५२ धावा केल्या. सहा विकेट पडल्यानंतर ग्लेन फिलिप्सने सूत्रे हाती घेतली. त्याने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने चार चौकार आणि चार षटकार फटकावले.  पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम आणि आगा सलमानने प्रत्येकी दोन बळी घेतले.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT