Latest

Paige Spiranac : जगातील सर्वात सुंदर गोल्फर

मोहन कारंडे

गोल्फ हा श्रीमंतांचा खेळ समजला जातो. भारतात या खेळाची क्रेज फारशी दिसत नाही; परंतु परदेशात मात्र याला क्रेज, ग्लॅमर फॅन फॉलोअर्सही आहेत. गोल्फमध्ये अनेक महिला खेळाडू अशा आहेत, ज्या दिसायला अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. अमेरिकेची महिला गोल्फर पेज स्पिरनाक ही नेहमी अशीच चर्चेत असते. गोल्फ कोर्सवर कपड्यांवरून ती अनेकदा ट्रोल झाली आहे.

टायगर वूडची फॅन असलेली स्पिरनाक ही स्वत:ला जगातील नंबर वन गोल्फ इन्फ्ल्युएन्सर मानते. हिने आता व्यावसायिक गोल्फमधून निवृत्ती घेतली आहे, पण सोशल मीडियावर मात्र ती सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर स्पिरनाकचे 3.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. येथे ती आपले फोटो आणि व्हिडीओज सातत्याने पोस्ट करीत असते.

स्पिरनाक गोल्फ कोर्सवर अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये वावरत असते. त्यामुळे तिच्यावर टीका होत असते; परंतु तिला यामुळे काडीचाही फरक पडत नाही. लहाणपणी स्पिरनाकला जिम्नॅस्ट व्हायचे होते; परंतु सरावादरम्यान तिला दुखापत झाल्याने ती गोल्फकडे वळली. येथे ती खेळापेक्षा आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आली.

स्पिरनाकचा एक्स बॉयफ्रेंडने तिचे काही आपत्तीजनक पर्सनल फोटो सोशल मीडियावर लीक केले होते. यामुळे स्पिरनाक खूपच त्रासली होती. यावेळी सोशल मीडियावर तिच्याबद्दल खूप वाईट कमेंटस् करण्यात आल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT