Latest

विनायक मेटेंनी मराठा समाजाची अस्मिता धगधगत ठेवली : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव

अविनाश सुतार

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (वय ५२) यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातून शोकसंवदेना व्यक्त करण्यात येत आहेत. मेटे यांच्या निधनावर 'दै. पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली.

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे गेले. मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासून आमच्यासोबत असणारे मेटे असे अचानक आपल्या सर्वांना सोडून जातील, याची कल्पना ही नव्हती. त्यांचे अचानक जाणे ही अतिशय क्लेशकारक दुर्घटना आहे. ते वेळोवेळी माझ्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडे येत असत. मराठा समाजाची अस्मिता धगधगत ठेवण्याचे महत्कार्य त्यांनी केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सातत्याने जागता ठेवला. एका लढवय्या नेत्याचा असा अकाली अंत होणे, खूपच वेदनादायक आहे. त्यांना माझी आदरांजली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT